Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 81 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (मंगळवारी, दि. 29) कोरोनाचे 81 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 4 हजार 641 झाली आहे. तर दिवसभरात 53 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

लोणावळा (महिला, 70 वर्ष), कार्ला (महिला, 42 वर्ष) येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 51 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 30 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 21, लोणावळा शहरात 30 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 4 हजार 641 रुग्णांमध्ये सध्या 660 रुग्ण सक्रीय आहेत. तर 3 हजार 820 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 161 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 400, लोणावळा नगरपरिषद 1 हजार 20 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 280 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 941 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण

मंगळवारी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत 10, कुणे ना मा 5, सांगावडे 4, कुसगाव बु 3, इंदोरी 2, शिवणे 2, माळवाडी, सुदवडी, जांबवडे, तळेगाव दाभाडे (ग्रामीण) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मावळातील 54 गावांमध्ये 15 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर 8 गावांमध्ये 15 पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 62 गावांना कोरोनाने वेढा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.