Maval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 81 नव्या रुग्णांची भर, 53 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.16) 81 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 53 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकाही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 250 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

सक्रिय रूग्णांची संख्या 1032 आहे. शहरी भागात 46 तर ग्रामीण भागात 35 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 43 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रुग्ण सापडला नसून वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 3 रुग्ण सापडले .

तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11325 झाली आहे. तर दिवसभरात 53 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात सोमाटणे 6, तळेगाव दाभाडे ग्रामीण 5, बेबड ओहोळ 2, गोडुंब्रे 2, कुसवली 2, कुसगाव °पमा 2, शिवणे 2, उर्से 2, टाकवे बुद्रुक 2, उकसान 2, घोणशेत, इंदोरी, सांगावडे, शिरगाव, साळुंब्रे, माळवाडी, साते व नायगाव येथे प्रत्येकी 1 असे एकूण 35 रुग्ण सापडले.

10043 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3697, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2156 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 704 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 6557 रुग्ण तर ग्रामीण भागात 4768 रुग्ण आढळून आले आहेत. 5 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 88.68 टक्के आहे तर मृत्यू दर 2.21 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 310, लोणावळा नगरपरिषदमध्ये 208, वडगाव नगरपंचायतमध्ये 48 व ग्रामीण भागात 466 असे एकूण 1032 रुग्ण आहेत.अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.