Maval Corona Update : मावळात 812 सक्रिय रुग्ण; 56 पॉझिटिव्ह , 29 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात गुरुवारी (दि.1) 56 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 238 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 812 वर पोहोचली आहे.

आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 08 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 13 रुग्ण व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 04 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 812 रुग्ण उपचार घेत आहेत.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 9858 झाली आहे. तर दिवसभरात 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

गुरुवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 25 रुग्ण तर ग्रामीण भागात 31 रुग्ण सापडले.

ग्रामीण भागात काले 05, सोमाटणे 05, कान्हे 04, पारवडी 03, वराळे 03, तळेगाव दाभाडे ग्रामीण 03, कामशेत 02, इंदोरी, आंबी, माळवाडी, प्रभाचीवाडी, शिलाटणे, टाकवे बुद्रुक येथे प्रत्येकी 01 एकूण 31 रुग्ण सापडले.

आतापर्यंत 8809 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 238 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3209, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1822 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 633 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 5664 रुग्ण तर ग्रामीण भागात 4194 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.