Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज 82 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 49 नवीन रुग्ण

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 25 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 24 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

0

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (मंगळवारी, दि. 15) कोरोनाचे 49 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 3 हजार 168 झाली आहे. तर दिवसभरात 82 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 25 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 24 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत 8, गहूंजे 3, कान्हे 3, तळेगाव दाभाडे ग्रामीण 2, वारू 2, ब्राह्मणवाडी -साते, सुदवडी, नायगाव, कुणे नामा, साळुंम्ब्रे , करंजगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 13, लोणावळा शहरात 11 आणि वडगावमध्ये 1 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 3 हजार 168 रुग्णांमध्ये सध्या 862 रुग्ण सक्रीय आहेत. तर 2 हजार 199 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 107 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 992, लोणावळा नगरपरिषद 618 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 214 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 344 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.