Maval Corona Update : मावळात 83 जणांना डिस्चार्ज ; आज 49 नवे रुग्ण

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.15) 49 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 83 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ग्रामीण भागात आज रुग्ण संख्येत वाढ झाली. मागील 15 दिवसात आठ रुग्णांची कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद झाल्याने, आतापर्यंत 458 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 626 आहे.

शहरी भागात 16 तर ग्रामीण भागात 33 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 11 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 01 रुग्ण सापडला, वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत ४ रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 22,919 झाली आहे. तर दिवसभरात 83 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात साळुंब्रे 05, पाचाणे, कामशेत व नवलाख उंब्रे प्रत्येकी 03, सोमाटणे, उर्से, निगडे व कुणे नामा प्रत्येकी 02, सुदुंबरे, परंदवडी, औंढे खुर्द, टाकवे बुद्रुक, पिंपळोली, चिखलसे, कान्हे, कुसगाव खुर्द, वराळे, मंगरूळ व धामणे प्रत्येकी 01 एकूण 33 रुग्ण सापडले.

आतापर्यंत  21,833 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 458 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,336 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3,906 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1185 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 12,427 रुग्ण तर ग्रामीण भागात 10,492 रुग्ण आढळून आले आहेत. 03 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.26 टक्के आहे तर मृत्यू दर 02 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 135 लोणावळा नगरपरिषदमध्ये 51 वडगाव नगरपंचायत मध्ये 36 व ग्रामीण भागात 404 असे एकूण 626 रुग्ण आहेत,  अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.