Maval Corona Update: तालुक्यात दिवसभरात 83 नवे रुग्ण तर 223 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात बुधवारी (दि. 12) 83 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 223 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

आज दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असुन आतापर्यंत 327 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2235 आहे.

शहरी भागात 39 तर ग्रामीण भागात 44 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 19 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 20 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडले नाही.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंत ची एकूण संख्या 16468 झाली आहे. तर दिवसभरात 223 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत 5, पुसाणे 5, चावसर 4, इंदोरी 4, उर्से 4, बेबड ओहळ 2, सुदवडी 2, वाडीवळे 2, बुधवडी, चांदखेड, चिखलसे, कुसगाव खुर्द, माळवाडी, मोरवे, पाथरगाव, साळुंब्रे, सांगिसे, शिळिंब, शिरगाव, सोमाटणे, सुदुंबरे, वडेश्वर व वराळे प्रत्येकी 1 एकूण 44 रुग्ण सापडले.

13906 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 327 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 5578, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3153 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 899 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 9630 रुग्ण तर ग्रामीण भागात 6838 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 84.44 टक्के आहे तर मृत्यू दर 1.99 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 763, लोणावळा नगरपरिषद मध्ये 401, वडगाव नगरपंचायत मध्ये 87 व ग्रामीण भागात 984 असे एकूण 2235 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.