Maval Corona Update: मावळ तालुक्यात रविवारी कोरोनाचे 86 नवीन रुग्ण; कामशेत ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

एकूण 2 हजार 374 रुग्णांमध्ये सध्या 632 रुग्ण सक्रिय आहेत. तर 1 हजार 648 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (दि. 6) कोरोनाचे 86 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 2 हजार 374 झाली आहे. तर दिवसभरात 61 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी शिलाटने (पुरुष 81 वर्ष), धामणे (महिला, 73 वर्ष), सुदुंबरे (पुरुष, 44 वर्ष), कान्हे (महिला, 65 वर्ष) येथील चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 56 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 30 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत 11, वराळे 7, इंदोरी 5, माळवाडी 2, शिलाटने, कान्हे, सुदुंबरे, उंबरे नवलाख, काले येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 26, लोणावळा शहरात 26 आणि वडगावमध्ये 4 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 2 हजार 374 रुग्णांमध्ये सध्या 632 रुग्ण सक्रिय आहेत. तर 1 हजार 648 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 784, लोणावळा नगरपरिषद 366 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 159 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 65 रुग्ण आढळून आले आहेत.

कामशेत ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात कामशेत येथे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कामशेत परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. प्रशासनाने इथे कठोर टाळेबंदीचा उपाय योजला आहे. तरीही कोरोना आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही. रविवारी कामशेत मध्ये 11 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.