Maval Corona Update : मावळात 86 जणांना डिस्चार्ज ; आज 47 नवे रुग्ण

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील रुग्ण संख्या कमी होऊ लागली असुन रुग्ण संख्येच्या दुप्पट रुग्ण बरे झाले आहेत. मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.8) 47  रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 86 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन, आतापर्यंत 449 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 677 आहे.

शहरी भागात 23  तर ग्रामीण भागात 24  रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 14  रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 3  रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 6 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 22,527 झाली आहे. तर दिवसभरात 86  रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात सोमाटणे 4, माळवाडी 3, शिरे, इंदोरी, नवलाख उंब्रे व वाकसई प्रत्येकी 2, काले, दारुंब्रे, साळुंब्रे, परंदवडी, कामशेत, नाणे, कान्हे, टाकवे बुद्रुक व तुंग प्रत्येकी 1 असे एकूण 24  रुग्ण सापडले.

21,401 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,251 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3878 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1164  रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 12,293 रुग्ण तर ग्रामीण भागात 10,234  रुग्ण आढळून आले आहेत. 2 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95  टक्के आहे तर मृत्यू दर 1.99 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 192 लोणावळा नगरपरिषदमध्ये 71  वडगाव नगरपंचायत मध्ये 34  व ग्रामीण भागात 380  असे एकूण 677  रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.