Maval Corona Update : मावळात आज 87 नवे रुग्ण; 61 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.13) 87 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 61 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 250 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या 938 आहे.

आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 21 रुग्ण सापडला. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 34 रुग्ण सापडले तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 05 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 938 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11017 झाली आहे. तर दिवसभरात 61 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला नाही.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 60 रुग्ण तर ग्रामीण भागात 27 रुग्ण सापडले. ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे ग्रामीण 13, नवलाख उंब्रे 05, कान्हे 03, धनगव्हाण 02, आंबी 02, इंदोरी व वराळे प्रत्येकी 01 असे एकूण 27 रुग्ण सापडले.

9828 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनाने एकही मृत्यू झाला नसून आतापर्यंत २५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3577, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2080 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 696 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 6353 रुग्ण तर ग्रामीण भागात 4664 रुग्ण आढळून आले आहेत. दोन रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 89.22 टक्के आहे तर मृत्यू दर 2.27 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 265, लोणावळा नगरपरिषद मध्ये 193, वडगाव नगरपंचायत मध्ये 53 व ग्रामीण भागात 427 असे एकूण 938 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यअधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.