Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज 89 जणांना डिस्चार्ज ; कोरोनाचे 78 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (गुरूवारी, दि. 1) कोरोनाचे 78 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 4 हजार 790 झाली आहे. तर दिवसभरात 89 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज मृत्यू झालेले 5 रुग्ण इंदोरी (महिला, 72 वर्ष), तळेगाव दाभाडे (पुरुष, 73), सोमाटणे फाटा आढले (महिला, 66 वर्ष), तळेगाव दाभाडे (महिला, 50 वर्ष), लोणावळा (पुरुष, 76 वर्ष) येथील आहेत.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 58 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 20 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 31, लोणावळा शहरात 24, वडगाव शहरात 3 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 4 हजार 790 रुग्णांमध्ये सध्या 634 रुग्ण सक्रीय आहेत. तर 3 हजार 988 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 166 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 456, लोणावळा नगरपरिषद 1 हजार 50 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 287 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 997 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण

गुरूवारी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये सोमाटणे 5, इंदोरी 3, तळेगाव दाभाडे (ग्रामीण) 3, माळवाडी 2, आंबी, कान्हे, कुसगाव बु, शिरे, कुसगाव प मा, नवलाख उंब्रे, टाकवे खु येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

मावळातील 55 गावांमध्ये 15 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर 8 गावांमध्ये 15 पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 63 गावांना कोरोनाने वेढा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.