Maval Corona Update : मावळात 9 जणांना डिस्चार्ज; दोन रुग्ण पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी जास्त होत आहे. तालुक्यात शुक्रवारी (दि.20) 2 रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 09 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रूग्णांची संख्या 42 आहे.

वडगाव नगरपंचायत व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. सध्या रुग्णालयात 42 रुग्ण उपचार घेत आहेत.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7602 झाली आहे. तर दिवसभरात 09 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 1 रुग्ण शहरी भागात तर ग्रामीण भागात इंदोरी येथे 1 सापडला.

ग्रामीण भागात 1 तर शहरी भागात वडगाव नगरपंचायत व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 01 असे एकूण 02 रुग्ण सापडले. 42 रुग्ण सक्रिय आहेत. 7348 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यात आज एकही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 212 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक2215, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1522 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 518 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4255 रुग्ण तर ग्रामीण भागात 3347 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहरे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.