Maval Corona Update : दिवसभरात 92 नवे रुग्ण; 172 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.14) 92 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 172 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असुन आतापर्यंत 334 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2176 आहे.

शहरी भागात 22 तर ग्रामीण भागात 70 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 8 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 10 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 4 रुग्ण सापडले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 16778 झाली आहे. तर दिवसभरात 172 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत 10, तळेगाव दाभाडे ग्रामीण 8, गोवित्री 8, इंदोरी 7, वराळे 7, उर्से 7, साळुंब्रे 5, माळवाडी 4, शिरगाव 3, नाणे 3, नवलाख उंब्रे 2 व भोयरे 2 असे एकूण 70 रुग्ण सापडले. 14268 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 5708, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3198 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 915 रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 9821 रुग्ण तर ग्रामीण भागात 6957 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 85.04 टक्के आहे तर मृत्यू दर 1.19 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 771 लोणावळा नगरपरिषद मध्ये 377 वडगाव नगरपंचायतमध्ये 92 व ग्रामीण भागात 936 असे एकूण 2176 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.