Maval Corona Update : दिवसभरात 93 नवे रुग्ण तर 77 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात रविवारी (दि.11) 93 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 249 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

सक्रिय रुग्णांची संख्या 808 आहे. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 16 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 16 रुग्ण तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 03 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 808 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10,825 झाली आहे. तर दिवसभरात 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 35 रुग्ण तर ग्रामीण भागात 58 रुग्ण सापडले. ग्रामीण भागात कामशेत 21, टाकवे बुद्रुक 06, भोयरे 06, करूंज 05, उर्से 04, सोमाटणे, चावसर बऊर या ठिकाणी प्रत्येकी 02 रूग्ण तर आर्डव, चिखलसे, गहूंजे, डाहुली, नेसावे, शिंदगाव, ओझर्डे, नाणे, फळणे व केवरे येथे प्रत्येकी एक असे एकूण 58 रुग्ण सापडले.

9768 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चार दिवसात तळेगाव दाभाडे हद्दीत 49 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय व 43 वर्षीय महिलेचा तसेच वडगाव नगरपंचायत हद्दीत 63 वर्षीय पुरुष व 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3555, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2046 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 685 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 6286 रुग्ण तर ग्रामीण भागात 4539 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 90.24 टक्के आहे तर मृत्यू दर 2.3 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 274, लोणावळा नगरपरिषद मध्ये 177, वडगाव नगरपंचायत मध्ये 46 व ग्रामीण भागात 311 असे एकूण 808 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.