Maval Corona Update : दिवसभरात तालुक्यात 94 नवे रुग्ण तर 65 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात बुधवारी (दि.7) 94 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 65 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसून आतापर्यंत 238 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

सक्रिय रुग्णांची संख्या 715 आहे. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 47 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 11 रुग्ण व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 06 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 715 रुग्ण उपचार घेत आहेत.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10416 झाली आहे. तर दिवसभरात 65 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 64 रुग्ण तर ग्रामीण भागात 30 रुग्ण सापडले.

ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे ग्रामीण 10, कामशेत 06, वराळे 05, नानोली तर्फे चाकण 02, करंजगाव 02, इंदोरी, खांडशी, नवलाख उंब्रे, सांगवी, आंबी येथे प्रत्येकी 01 असे एकूण 30 रुग्ण सापडले.

9463 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 238 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3449, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1966 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 662 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 6077 रुग्ण तर ग्रामीण भागात 4339 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 90.85 टक्के आहे तर मृत्यू दर 02.28 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 306, लोणावळा नगरपरिषद मध्ये 167, वडगाव नगरपंचायत मध्ये 38 व ग्रामीण भागात 204 असे एकूण 715 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.