Maval Corona Update : आज दिवसभरात तालुक्यात 94 नवे रुग्ण; 109 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील रुग्ण संख्येत वाढ झाली असुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मावळ तालुक्यात बुधवारी (दि.9) 94 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन, आतापर्यंत 449 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 662 आहे.

शहरी भागात 24 तर ग्रामीण भागात 70 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 20 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 4 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 22621 झाली आहे. तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात तुंग 16, कामशेत 8, कुणे नामा 5, कुसगाव बुद्रुक 5, कुरवंडे 4, दारुंब्रे, नवलाख उंब्रे, साळुंब्रे, सोमाटणे, वेल्हेवळी व कान्हे प्रत्येकी 3, नायगाव 2, साते, करंडोली, घोणशेत, नाणे, मोहितेवाडी, बेलज, माळवाडी, धनगव्हाण, वराळे, बुधावडी, धामणे व पाले नामा प्रत्येकी 1 असे एकूण 70 रुग्ण सापडले.

21510 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7271 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3882 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1164 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 12317 रुग्ण तर ग्रामीण भागात 10304 रुग्ण आढळून आले आहेत. 2 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.09 टक्के आहे तर मृत्यू दर 1.98 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 187 लोणावळा नगरपरिषदमध्ये 46 वडगाव नगरपंचायत मध्ये 28 व ग्रामीण भागात 401 असे एकूण 672 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.