Maval Corona Update :  दिवसभरात 96 नवे रुग्ण तर दोन रुग्णांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सोमवारी (दि. 19) 96 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 96 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

जेवढे रुग्ण सापडले तेवढेच रुग्ण बरे झाले असून तळेगाव दाभाडे हद्दीत सलग दोन दिवस रुग्ण संख्या शून्य आहे. आज दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून आतापर्यंत 252 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

सक्रिय रुग्णांची संख्या 1128 आहे. शहरी भागात 24 तर ग्रामीण भागात 72 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रुग्ण सापडला नाही. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 12 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 12 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11648 झाली आहे. तर दिवसभरात 96 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे ग्रामीण 9, बऊर 7, कामशेत 6, थुगाव 6, इंदोरी 5, करंज गाव 5, साळुंब्रे 5, गहूंजे 4, जांभवडे 4, नाणे 2, फळणे 2, शिलाटणे 2, सुदुंबरे 2, उकसान 2, आढले खुर्द, आंबी, चिखलसे, कोळे चाफेसर, माऊ, नायगाव, नानोली तर्फे चाकण, शिवणे, वराळे, वडेश्वर, टाकवे खुर्द येथे प्रत्येकी 1 असे एकूण 72 रुग्ण सापडले.

10268 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 252 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3730, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2259 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 727 रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 6716 रुग्ण तर ग्रामीण भागात 4932 रुग्ण आढळून आले आहेत. 5 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 88.15 टक्के आहे तर मृत्यू दर 2.16 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 239, लोणावळा नगरपरिषद मध्ये 274, वडगाव नगरपंचायत मध्ये 65 व ग्रामीण भागात 550 असे एकूण 1128 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.