Maval Corona Update : दिवसभरात 97 नवे रुग्ण तर 102 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात गुरुवारी (दि.8) 97 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 102 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसून आतापर्यंत 238 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

सक्रिय रुग्णांची संख्या 710 आहे. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 40 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 18 रुग्ण तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही.

सध्या रुग्णालयात 710 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10,513 झाली आहे. तर दिवसभरात 102 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. गुरूवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 58 रुग्ण तर ग्रामीण भागात 39 रुग्ण सापडले.

ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे ग्रामीण 16, वराळे 06, सोमाटणे 04, इंदोरी 04, भोयरे 02, माळवाडी,सुदुंबरे, माळेगाव खुर्द, मळवंडी ठुले, चावसर, सांगवी, शिरगाव येथे 01 एकूण 39 रुग्ण सापडले.

9565 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 238 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3489, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1984 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 662 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 6135 रुग्ण तर ग्रामीण भागात 4378४ रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 90.98 टक्के आहे तर मृत्यू दर 2.26 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 288, लोणावळा नगरपरिषद मध्ये 174, वडगाव नगरपंचायत मध्ये 33 व ग्रामीण भागात 215 असे एकूण 710 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.