Maval Corona Update : तालुक्यात आज 97 नवे रुग्ण तर 53 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील रुग्ण संख्येत वाढ झाली असुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.18) 97 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 53 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. मागील 15 दिवसात 5 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद झाल्याने, आतापर्यंत 488 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 628 आहे.

शहरी भागात 50 तर ग्रामीण भागात 47 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 35 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 13 रुग्ण सापडले, वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 02 रुग्ण सापडले. तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 23,126 झाली आहे. तर दिवसभरात 53 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत 08, तळेगाव दाभाडे ग्रामीण 07, वराळे व बेलज प्रत्येकी 03, चांदखेड, साळुंब्रे, घोणशेत व मंगरूळ प्रत्येकी 02, नायगाव, पाटण, ब्राम्हणवाडी, करंजगाव, आंबी, बोरज, जांभूळ, कान्हे, टाकवे बुद्रुक, वेल्हावळी, नवलाख उंब्रे, कोथुर्णे, राजपुरी,किवळे, भोयरे, काल्हाट, शिलाटणे, नागाथली व वडगाव प्रत्येकी 01 एकूण 47 रुग्ण सापडले.

22,009 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 488 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,402 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3,923 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1188 रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 12,513 रुग्ण तर ग्रामीण भागात 10,613 रुग्ण आढळून आले आहेत. 03 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.17 टक्के आहे तर मृत्यू दर 2.11 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 163 लोणावळा नगरपरिषदमध्ये 41 वडगाव नगरपंचायत मध्ये 31 व ग्रामीण भागात 393 असे एकूण 628 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.