Maval Corona Update : मावळ तालुक्यात केवळ 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी जास्त होत असून मावळ तालुक्यात आजपर्यंत (दि. 28) कोरोनाचे 14 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 209 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7402 झाली आहे. तर दिवसभरात 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 6 रुग्ण शहरी भागात तर 08 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये टाकवे बुद्रुक 2, तळेगाव दाभाडे ग्रामीण, माळवाडी, कामशेत, इंदोरी, सुदुंबरे, सुदवडी प्रत्येकी 01 असे एकूण 08 रुग्ण आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 04 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 02 असे एकूण 06 रुग्ण सापडले तर लोणावळा नगरपरिषद हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. 219 रुग्ण सक्रिय आहेत. 6974 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळ तालुक्यात आज कोरोनाने एकही मृत्यू झाला झाला नाही. आतापर्यंत 209 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2144, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1471 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 510 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 4125 रुग्ण तर ग्रामीण भागात 3277 रुग्ण आढळून आले आहेत. एका रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.