Maval Corona Update : मावळात कोरोना रुग्णांची ‘सेंच्युरी’  ! 108 नवीन रुग्णांची नोंद; 136 जणांना डिस्चार्ज 

 एमपीसीन्यूज  :   मावळ  तालुक्यात शनिवारी (दि.3) 108 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात  दिवसभरात 136 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. तालुक्यात आतापर्यंत 238 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 788 आहे.

आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 48 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 29 रुग्ण व  वडगाव

नगरपंचायतीच्या हद्दीत 08 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 788 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10042  झाली आहे. तर दिवसभरात 136 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 85 रुग्ण तर ग्रामीण भागात 23 रुग्ण सापडले. ग्रामीण भागात कामशेत 13, जांभूळ 02, तिकोणा 02, कान्हे, काले, शिळिंब, साते, नायगाव टाकवे बुद्रुक 01 एकूण 23 रुग्ण सापडले.

आतापर्यंत तालुक्यात 9017 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 238 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3283, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1884 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 643 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 5810 रुग्ण तर ग्रामीण भागात 4232  रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 89.79 टक्के आहे तर  मृत्यू दर 2.37 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे  नगरपरिषदमध्ये 345, लोणावळा नगरपरिषद मध्ये 138, वडगाव नगरपंचायत मध्ये 40 व ग्रामीण भागात 265 असे एकूण 788 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.