Maval Corona Update : मावळात कोरोनाची वाढ सुरूच; आज 97 नवे रुग्ण, रुग्णांची संख्या 718

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात शनिवारी (दि.27) 97 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 41 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 718 वर पोहोचली आहे.

आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 52 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 16 रुग्ण व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 02 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 718 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 9429 झाली आहे. तर दिवसभरात 41 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 70 रुग्ण सापडले. ग्रामीण भागात कार्ला व कामशेत प्रत्येकी 06, देवले 05, कडधे 03, तिकोणा व आंबी येथे प्रत्येकी 02, तळेगाव दाभाडे ग्रामीण, नवलाख उंब्रे व माळवाडी प्रत्येकी 01 एकूण 32 रुग्ण सापडले.

8480 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3022, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1765 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 607 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 5394रुग्ण तर ग्रामीण भागात 4035 रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यातील एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.