_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Maval Corona Update : तालुक्यातील रुग्णसंख्येत घट; 64 जणांना डिस्चार्ज

0

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील रुग्णसंख्येत घट झाली असुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मावळ तालुक्यात गुरुवारी (दि. 10) 61 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 64 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एक रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला असुन, आतापर्यंत 450 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 658 आहे.

शहरी भागात 24 तर ग्रामीण भागात 37 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 14 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 6 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 4 रुग्ण सापडले.

_MPC_DIR_MPU_II

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 22682 झाली आहे. तर दिवसभरात 64 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. गुरुवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात वाकसई 7, वराळे 6, कामशेत 5, कान्हे 3, टाकवे बुद्रुक, परंदवडी व बेलज प्रत्येकी 2, वारू, तिकोणा, कचरे वाडी, भोयरे, इंगळुन, कार्ला, कुणे अनसुटे, आंबी तळेगाव दाभाडे ग्रामीण व मंगरूळ प्रत्येकी 1 असे एकूण 37 रुग्ण सापडले.

21574 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 450 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7285 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3888 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1164 रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 12341 रुग्ण तर ग्रामीण भागात 10341 रुग्ण आढळून आले आहेत. 4 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.12 टक्के आहे तर मृत्यू दर 1.98 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 165 लोणावळा नगरपरिषदमध्ये 51 वडगाव नगरपंचायत मध्ये 31 व ग्रामीण भागात 411 असे एकूण 658 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment