Maval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 74 जणांना डिस्चार्ज; 64 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सोमवारी (दि.19) 64 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 74 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 501 इतकी आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 496 आहे. शहरी भागात 38 तर ग्रामीण भागात 26 रुग्ण आज सापडले.

आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 18८ रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 15 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 5 रुग्ण सापडले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 25,325 झाली आहे. तर दिवसभरात 74 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कल्हाट 3, घोणशेत, इंगळुन, सदापूर, टाकवे बुद्रुक, व टाकवे खुर्द प्रत्येकी 2, ब्राम्हणोली, चिखलसे, देवघर, गोवित्री, जांभूळ, काले, कुसगाव बुद्रुक, पवळेवाडी, शिरगाव, सुदुंबरे, तळेगाव दाभाडे ग्रामीण, तुंग व वराळे प्रत्येकी 1 असे एकूण 26 रुग्ण सापडले.

तालुक्यात आतापर्यंत 24,328 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8031 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4249 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1280 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 13,560 रुग्ण तर ग्रामीण भागात 11,765 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.06 टक्के आहे तर मृत्यू दर 1.98 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 157 लोणावळा नगरपरिषदमध्ये 96 वडगाव नगरपंचायतमध्ये 24 व ग्रामीण भागात 219 असे एकूण 496 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.