Maval Corona Update : दिवसभरात 09 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह तर 06 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात शुक्रवार (दि.26) 09 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 06 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 73 आहे.

तळेगाव नगरपरिषद व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 07 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 73 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8267 झाली आहे. तर दिवसभरात 06 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 07 रुग्ण सापडले तर ग्रामीण भागात कान्हे व गहुंजे येथे प्रत्येकी 01 रूग्ण सापडला.

ग्रामीण भागात 02 रुग्ण सापडले तर शहरी भागात 07 रुग्ण सापडले. सध्या 73 रुग्ण सक्रिय आहेत. 7970 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2535, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1625 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 543 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4702 रुग्ण तर ग्रामीण भागात 3565 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.