Maval Corona Update: वडगाव येथील पिता-पुत्र कोरोना पॉझिटीव्ह, सक्रिय रुग्णांची संख्या 28 वर

Maval Corona Update: Father & son in Vadgaon tested Corona positive, number of active patients at 28 मावळात आतापर्यंत 29 रुग्णांनी केली कोरोनावर मात

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे राहणारा व पुण्यातील कंपनीत कामाला जाणारा एक 33 वर्षीय कामगार व त्याचे 64 वर्षीय वडील अशा दोघांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आज (सोमवारी) पॉझिटीव्ह आला. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 59 झाला आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून 29 कोरोनामुक्तांना घरी सोडण्यात आले आहे. तालुक्यातील 28 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

वडगाव मावळ येथे राहणारा हा 33 वर्षीय कामगार पुण्यातील एका कंपनीत कामाला जात होता. त्याचा एक सहकारी कोरोनाबाधित होता. त्याला 15 तारखेपासून त्रास जाणवत होता. या मुलाच्या संपर्कात आलेल्या 64 वर्षीय वडिलांना 19 तारखेपासून लक्षणे जाणवत होती. या दोघांना 21 तारखेला कान्हे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयातून तळेगाव जनरल हॉस्पिटल येथील कोविड रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्या दोघांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

कन्टेन्मेंट झोन व बफर झोन जाहीर

​वडगाव मावळ येथे दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर निसर्ग स्पर्श सोसायटी परिसराला कन्टेन्मेंट झोन तर वडगावच्या प्रभाग क्र. 13 ला बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी काढला. ​

मावळात आजपर्यंत एकूण 59 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यातील 19 जण शहरी भागातील तर 40 जण ग्रामीण भागातील आहेत. त्यापैकी 28 सक्रिय रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती चांगली आहे.. तालुक्यातील एकूण 29 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर आतापर्यंत तालुक्यात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी 10 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज

कोरोनावर मात केलेल्या एकूण 10 रुग्णांना सोमवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यात कडधे येथील 5 रुग्णांचा समावेश होता. त्यांना आज कोविड केअर सेंटर,राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्र तळेगाव दाभाडे येथून आज घरी सोडण्यात आले.

याप्रसंगी तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड, मावळ तालुक्याचे कोविड समन्वयक वैद्यकीय अधिकारी डॉ. गुणेश बागडे तसेच कोविड केअर सेंटर येथे कामकाज पाहणारे डॉ. पद्मवीर थोरात, डॉ मनीषा साळवे, डॉ.मनीषा गावंडे, डॉ. मीनाक्षी माळगे व वडगाव मावळ ग्रामीण रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.