Maval Corona Update : मावळात आज चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या कमी होत आहे. तालुक्यात गुरुवारी (दि.५) 4 रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. तर एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. दरम्यान, आतापर्यंत 212 मृत्यू झाले आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. तालुक्यात एकूण 96  रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7497  झाली आहे. तर दिवसभरात 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गुरुवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 2 रुग्ण शहरी भागात, तर 2 रुग्ण ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात कामशेत व नाणे, प्रत्येकी 1  असे एकूण 2  रुग्ण, तर शहरी भागात लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2 कोरोना रुग्णांची नोंद झाली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद व वडगाव नगरपंचायत हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. तालुक्यात एकूण ९६ रुग्ण सक्रिय आहेत.  7189  जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यात आज एकही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 212  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2180,  लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1492 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 514 रुग्णांची नोंद झाली.

शहरी भागात 4186  रुग्ण तर ग्रामीण भागात 3311  रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.