Maval Corona Update : मावळात चार जणांना डिस्चार्ज, तीन नवीन रुग्णांची नोंद

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात शनिवारी (दि.6) 3 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 4जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रूग्णांची संख्या 49 आहे.

तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रूग्ण सापडला नाही. तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 1, तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 2 रूग्ण सापडले आहेत. सध्या रूग्णालयात 49 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील आजपर्यंतच्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8139 झाली आहे.’

दिवसभरात 4 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 7866 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी ग्रामीण भागात एकही रूग्ण सापडला नाही.

मावळ तालुक्यातील आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2467, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1608 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 537 रुग्ण सापडले आहेत.

आजपर्यंत शहरी भागात 4612 रुग्ण तर ग्रामीण भागात 3527 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.