Maval Corona Update : मावळात आज चौघांना डिस्चार्ज ; दोन नव्या रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात शनिवारी (दि.13) 2 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 4 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 45 आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद व लोणावळा नगरपरिषद हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 01 रूग्ण सापडला. सध्या रुग्णालयात 45 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8167 झाली आहे. तर दिवसभरात 4 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 01 रुग्ण सापडला, तर ग्रामीण भागात कान्हे येथे 01 रूग्ण सापडला. तालुक्यात सध्या 45 रुग्ण सक्रिय आहेत. 7898 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू झाला. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2482, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1613 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 539 रुग्ण सापडले आहेत.

आजपर्यंत शहरी भागात 4634 रुग्ण तर ग्रामीण भागात 3533 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.