Maval Corona Update: मावळ तालुक्यात रविवारी चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू; नवीन 30 रुग्णांची नोंद

Maval Corona Update: Four people died due to corona in Maval taluka on Sunday; 30 new patients found आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 21 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 9 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (दि. 2) चार कोरोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाला. मावळमध्ये आजवर 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 30 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्ण संख्या 808 इतकी झाली आहे.

मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 48, 78 आणि 32 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. तिन्ही मृत रुग्ण तळेगाव शहरातील आहेत. तर कुरवंडे येथील एका 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 21 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 9 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये तळेगाव दाभाडे ग्रामीण, कामशेत येथील प्रत्येकी दोन, माळवाडी, वराळे, सुदुंबरे, बधलवाडी, आढले बु. येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 19, वडगाव आणि लोणावळा शहरात प्रत्येकी एक रुग्णाची नोंद झाली आहे.

एकूण 808 रुग्णांमध्ये सध्या 413 रुग्ण सक्रिय आहेत. तर 370 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 260, लोणावळा नगरपरिषद 265 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 50 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 433 रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या रुग्णालयात 225 आणि होम आयसोलेशनमध्ये 188 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.