-MPC-TOP-MOST-BANNER-I

Maval Corona Update: तालुक्यातील  दुग्ध, पोल्ट्री आणि फुल व्यवसायाचे प्रचंड नुकसान

Maval Corona Update: Huge loss to dairy, poultry and flower business in the taluka

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मावळ तालुक्यातील  दुग्ध, पोल्ट्री आणि फुल व्यवसायाचे प्रचंड नुकसान झालेले असून शेती पूरक व्यवसायांचे पूर्ण अर्थकारणच कोलमडले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गेल्या मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन लागू  करण्यात आले. तसेच सर्वत्र जमावबंदी आणि संचारबंदी लागू असल्याने दूध, पोल्ट्री उत्पादन आणि फुले या मालाची विक्री पूर्णपणे थांबली.त्यामुळे   मोठे आर्थिक नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान दुग्ध व्यवसायाचे झाले असल्याचे  व्यावसायिक मनोज ढमाले यांनी सांगितले.

मावळ  तालुक्‍यात सुमारे दहा हजार दूध उत्पादक शेतकरी असून रोज 80 ते  90 हजार लिटर दुधाचे उत्पादन होते. लॉकडाऊनच्या काळात मुख्य बाजारपेठा आणि त्यांना जोडणारे रस्ते बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या दुधाची विक्री होऊ शकली नाही. गेल्या दोन महिन्यापासून हॉटेल, चहाची दुकाने, मिठाईची दुकाने बंद असल्याने दूध विक्री घटून दोन महिन्यात सात ते आठ कोटी रुपयांचे नुकसान झाले. असल्याचे दूध उत्पादक ढमाले यांनी सांगितले.

दूध व्यवसायाच्या पाठोपाठ  मावळ तालुक्यात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. मावळ तालुक्यात  १२००  पोल्ट्री व्यावसायिक  आहेत. लॉक डाऊन मुळे  आणि  पोल्ट्री चिकन बाबतच्या अफवांमुळे पोल्ट्री उत्पादकांना अनेक दिवस दिवस पक्षी सांभाळावे लागले. तर या कालावधीत पक्षाचे दरही मातीमोल झाले. त्यामुळे सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले. तर अनेकांनी या आर्थिक फटक्यामुळे पुन्हा आपला व्यवसाय सुरु करण्याचे धाडस दाखवले नसल्याचे  पोल्ट्री उद्योजक अ‍ॅड. नामदेव दाभाडे यांनी सांगितले.

कोरोनामुळे  मावळातील फुल शेती उद्योगाला ही प्रचंड आर्थिक फटका बसला असल्याचे फुल उत्पादक ज्ञानेश्वर ठाकर यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारपेठेत मावळ तालुक्यातील फुले विकली जातात. मात्र गेली दोन महिने सगळे व्यवहार बंद झाल्याने उमललेली गुलाबाची व इतर फुले आणि सुवासिक फुले तोडून फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.  याशिवाय कुशल मजूर, वीज, पाणी यांचा आर्थिक भार मात्र अंगावर असल्याचे ठाकर यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यात झालेले नुकसान कसे भरून निघणार याच चिंतेत सर्वजण आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn