Maval Corona Update : मावळमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.16 टक्के

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.20) 57 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 79 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. तालुक्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.16 टक्के इतका आहे.

आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 501 इतकी आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 474 आहे. शहरी भागात 25 तर ग्रामीण भागात 32 रुग्ण आज सापडले.

आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 14 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 11 रुग्ण, वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत एकही रुग्ण सापडला नाही. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 25,382 झाली आहे. तर दिवसभरात 79 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात चांदखेड 15, शिवणे व शिरगांव प्रत्येकी 03, पवळेवाडी व टाकवे खुर्द प्रत्येकी 02, आढले बुद्रुक, कल्हाट, गहुंजे, इंदोरी, नवलाख उंब्रे, निगडे व टाकवे बुद्रुक येथे प्रत्येकी 1 असे एकूण 32 रुग्ण सापडले.

तालुक्यात आतापर्यंत 24,407 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8045 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4260 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1280 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 13,585 रुग्ण तर ग्रामीण भागात 11,797 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.16 टक्के आहे तर मृत्यू दर 1.97 टक्के आहे.
सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 139 लोणावळा नगरपरिषदमध्ये 93 वडगाव नगरपंचायतमध्ये 22 व ग्रामीण भागात 220 असे एकूण 474 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.