Maval Corona Update : मावळात आज 14 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; 5 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी जास्त होत आहे. तालुक्यात शनिवारी (दि.21) 14 रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 05 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सक्रिय रूग्णांची संख्या 51 आहे.

वडगाव नगरपंचायत हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. सध्या रुग्णालयात 51 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7616 झाली आहे.

तर दिवसभरात 05 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 10 रुग्ण शहरी भागात तर ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे ग्रामीण 2 व सोमाटणे, शिरगांव येथे प्रत्येकी 1रूग्ण सापडला.

ग्रामीण भागात 4 तर शहरी भागात वडगाव नगरपंचायत हद्दीत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 7 तर लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3 असे एकूण 10 रुग्ण सापडले. 51 रुग्ण सक्रिय आहेत. 7345 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यात आज एकही मृत्यू झाला नाही. 08 जणांचे मृत्यू हे यापूर्वीचे आहेत, मात्र त्याची नोंद आज करण्यात आली आहे. आतापर्यंत 220 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2222, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1525 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 518 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4265 रुग्ण तर ग्रामीण भागात 3351 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहरे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.