Maval Corona Update : मावळात आज 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; 12 मृत्यू

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी होत असून शहरी भागात केवळ 6 रुग्ण सापडले. मावळ तालुक्यात सोमवारी (दि.26) कोरोनाचे 16 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

लोणावळा हद्दीत 06, तर तळेगाव दाभाडे हद्दीत 03 रुग्णांचा शहरी भागात व ग्रामीण भागात 03 अशा सोमवारी12 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत 208 मृत्यू झाले आहेत.

तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 7383 झाली आहे. तर दिवसभरात 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 06 रुग्ण शहरी भागात तर 10 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये सोमाटणे 3, पुसाणे 2, गहूंजे, सुदुंबरे, शिरगाव, कुसगाव बुद्रुक, वराळे प्रत्येकी एक असे एकूण 10 रुग्ण आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 02 , लोणावळा नगरपरिषद हद्दीत 02 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 02 असे एकूण 06 रुग्ण सापडले. 282 रुग्ण सक्रिय आहेत. 6893 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे .

मावळ तालुक्यात लोणावळा येथे 69 वर्षीय महिला, 63 वर्षीय पुरुष, 90 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष असे सहा जणांचा तर, तळेगाव दाभाडे येथे 60 वर्षीय पुरुष, 74 वर्षीय महिला, 75 वर्षीय महिला असे तीन जणांचा, कामशेत येथे 69वर्षीय पुरुष, कोंडीवडे येथे 36 वर्षीय पुरुष, सोमाटणे येथे 56 वर्षीय पुरुष असे एकूण 12 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला झाला आहे. आतापर्यंत 208 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2139, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1470 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 508 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 4117 रुग्ण तर ग्रामीण भागात 3266 रुग्ण आढळून आले आहेत.

दोन रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहरे व कोविड समन्वयक डॉ. गणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III