Maval Corona Update : मावळात आज 26 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; 8 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात सोमवारी (दि.11) 26 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 08जणांना डिस्चार्ज देण्यात आला. मागील दोन दिवसातील प्रलंबित अहवाल आज प्राप्त झाले. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रूग्णांची संख्या 54 आहे.

वडगाव नगरपंचायत हद्दीत आज एकही रूग्ण सापडला नाही. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 18 रूग्ण, तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 05 रूग्ण सापडले आहेत. सध्या रूग्णालयात 54 रुग्ण उपचार घेत आहेत.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8009 झाली आहे. दिवसभरात 08 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 23 रुग्ण तर ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे (ग्रामीण) येथे 02 तर गहुंजे येथे 01 रूग्ण सापडला.

ग्रामीण भागात 03 रूग्ण सापडले तर शहरी भागात 23 रूग्ण सापडले. तालुक्यात सध्या 54 रुग्ण सक्रिय आहेत. 7731 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आजपर्यंत तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2407, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1589 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 534 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4530 रुग्ण, तर ग्रामीण भागात 3479रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.