Maval Corona Update : मावळात आज 27 रुग्णांची नोंद; 16 जणांना डिस्चार्ज

Maval recorded 27 patients today; Discharged 16 people;दिवसभरात लोणावळ्यात एक तर वडगावात एकाही रुग्णाची नोंद नाही

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (मंगळवारी) 27 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 640 झाला आहे. तर आज 16 रुग्णांना पूर्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 18 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 9 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

यामध्ये कामशेत येथील दोन, वराळे, वडगाव, सोमाटणे, शिरगाव, साते, पिंपळोली, ब्राह्मणवाडी-बऊर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

शहरी भागात सापडलेल्या 18 रुग्णांपैकी 17 रुग्ण तळेगाव शहरातील आहेत. तर एक रुग्ण लोणावळा शहरातील आहे. वडगाव नगर पंचायत क्षेत्रात आज एकाही रुग्णाची नोंद नाही.

एकूण 640 रुग्णांमध्ये सध्या 386 रुग्ण सक्रीय आहेत. तर 240 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या रुग्णालयात 188 आणि होम आयसोलेशनमध्ये 198 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.