Maval Corona Update : मावळात 33  नव्या रुग्णांची नोंद; 12 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात सोमवारी (दि.8) 33 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 144 आहे.

वडगाव नगरपंचायत व लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रुग्ण सापडला नाही. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 24 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 144 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8421 झाली आहे. तर दिवसभरात 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 24 रुग्ण सापडले तर ग्रामीण भागात कुसगाव बुद्रुक, इंदोरी, माळवाडी व तळेगाव दाभाडे ग्रामीण   येथे प्रत्येकी 02 व सुदुंबरे येथे 01रूग्ण सापडला.

_MPC_DIR_MPU_II

आतापर्यंत  8046 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2591, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1662 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 558 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4811 रुग्ण तर ग्रामीण भागात 3610 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.