Maval Corona Update : मावळात 58 सक्रिय रुग्ण, 5 नव्या रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात बुधवार (दि.17) 5 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात एकालाही डिस्चार्ज देण्यात आला नाही. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 58 आहे.

वडगाव नगरपंचायत व लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही तर तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीत 05 रूग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 58 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8182 झाली आहे.

तर दिवसभरात एकालाही डिस्चार्ज देण्यात आला नाही. बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 05 रुग्ण सापडले तर ग्रामीण भागात एकही रूग्ण सापडला नाही.

आतापर्यंत 7910 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2496, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1614 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 540 रुग्ण सापडले आहेत.

तसेच शहरी भागात 4650 रुग्ण तर ग्रामीण भागात 3542 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.