Maval corona update : तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्या; एका दिवसात आढळले 211 रुग्ण

एमपीसी न्यूज – देशात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मावळ तालुक्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आज (शनिवारी, दि. 15) आढळले आहेत. मावळ तालुक्यात शनिवारी 211 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात दिवसभरात 116 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णसंख्या वाढत असली तरी पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लक्षणे सौम्य आहेत.

आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही, आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 830 आहे. शहरी भागात 116 रूग्ण तर ग्रामीण भागात 95 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 67 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 42 रूग्ण आज सापडले.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 07 रूग्ण आज सापडले.

तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 29,087 झाली आहे. तर दिवसभरात 116 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले

शनिवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे (ग्रामीण) येथे 11 रूग्ण सापडले. गहुंजे,कामशेत व कुरवंडे येथे प्रत्येकी 09 रुग्ण सापडले. कुसगाव बुद्रुक येथे 08 रुग्ण सापडले. वराळे येथे 07 रूग्ण सापडले. कुणे नामा व कान्हे येथे प्रत्येकी 05 रुग्ण सापडले. सोमाटणे येथे 04 रूग्ण सापडले. सांगीसे येथे 03 रूग्ण सापडले. इंदोरी, वळख, डोंगरगाव व जांभूळ येथे प्रत्येकी 02 रुग्ण सापडले. तर शिरगाव,मळवली नामा, आढले बुद्रुक,बेबडओव्हळ,करंजगाव, कुसगाव खुर्द,करूंज,आंबी, नायगाव, शिवली,साते,महागाव,ब्राह्मणवाडी(साते),तिकोणा व वाकसई येथे प्रत्येकी 01रुग्ण सापडला. असे एकूण 95 रुग्ण सापडले.

27,732 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 9,363 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,826 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,440 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 15,629 रुग्ण तर ग्रामीण भागात 13,458 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही.
कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.34
टक्के आहे तर मृत्यू दर 1.80 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 302, लोणावळा नगरपरिषदमध्ये 160 वडगाव नगरपंचायतमध्ये 40 व ग्रामीण भागात 328 असे एकूण 830 रुग्ण आहेत.अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.