Maval Corona Update: नवीन एक रुग्ण, तिघांना डिस्चार्ज, सक्रिय रुग्णसंख्या पन्नासच्या खाली

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी जास्त होत आहे. तालुक्यात रविवारी (दि.22) 01 रुग्णाचा  चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 03 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रूग्णांची संख्या 49 आहे. 

वडगाव नगरपंचायत, तळेगाव दाभाडे नगरपरिषद व लोणावळा नगरपरिषदेच्या  हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. सध्या रुग्णालयात 49 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7617 झाली आहे. तर दिवसभरात 03 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात एकही रूग्ण सापडला नाही तर ग्रामीण भागात सोमाटणे येथे 1 सापडला.

ग्रामीण भागात 1 तर शहरी भागात वडगाव नगरपंचायत, तळेगाव दाभाडे नगरपरिषद व लोणावळा नगरपरिषदेच्या  हद्दीत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. 49 रुग्ण सक्रिय आहेत. 7348 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यात आज एकही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 220 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक2222, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1525 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 518 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4265 रुग्ण तर ग्रामीण भागात 3352 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहरे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.