Maval Corona Update : मावळच्या ग्रामीण भागात रुग्ण वाढले; आज 154 नवे रुग्ण, 95 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात शनिवारी (दि.24) 154 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 95  जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढली आहे. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 254  रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

मावळ तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 1388 आहे. शहरी भागात 54  तर ग्रामीण भागात 100 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 46  रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 6 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 2 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 12,294 झाली आहे. तर दिवसभरात 95  रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात बऊर 41१, कान्हे 16, उर्से 5, राजपुरी 4, सोमाटणे 4, भोयरे 4, टाकवे बुद्रुक 4, वराळे 4, बेलज 2, दहिवली 2, चांदखेड, गोडुंब्रे, जांभूळ, कचरेवाडी, कडधे, कांब्रे नामा, कामशेत, करूंज, कशाळ, पाथरगाव, सांगावडे, साते, शिरगाव, सुदुंबरे येथे प्रत्येकी 1, असे एकूण 100 रुग्ण सापडले.

10,652 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 254 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3858, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2404 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 751 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात7013  रुग्ण तर ग्रामीण भागात 5281 रुग्ण आढळून आले आहेत. 6 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 86.64  टक्के आहे तर मृत्यू दर 2.07 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये 311, लोणावळा नगरपरिषदमध्ये 358, वडगाव नगरपंचायतमध्ये 60  व ग्रामीण भागात 659 असे एकूण 1388 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.