Maval Corona Update : मावळात 10 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; 5 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी जास्त होत आहे. तालुक्यात शनिवारी (दि.5) 10 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 05 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रूग्णांची संख्या 55 आहे.

लोणावळा नगरपरिषदेच्या व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. सध्या रुग्णालयात 55 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7715 झाली आहे. तर दिवसभरात 05 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 6 रुग्ण तर ग्रामीण भागात सोमाटणे 3, शिरगांव येथे 1 सापडला.

ग्रामीण भागात 4 रूग्ण सापडले. तर शहरी भागात तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 6 रूग्ण सापडले तर वडगाव नगरपंचायतीच्या व लोणावळा नगरपरिषद हद्दीत एकही रूग्ण सापडला नाही. 55 रुग्ण सक्रिय आहेत. 7438 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 222 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2265, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1545 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 524 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4364 रुग्ण तर ग्रामीण भागात 3381 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.