Maval Corona Update : मावळ तालुक्यात सहा रुग्णांचा मृत्यू; 45 नवीन रुग्ण

कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 154 झाली आहे. ; Six patients die in Maval taluka; 45 new patients

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा एक हजारच्या पुढे गेला आहे. आज (सोमवारी, दि. 10) कोरोनाचे 45 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 154 झाली आहे. तर दिवसभरात 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सहा रुग्णांचा एकाच दिवसात मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेले रुग्ण तळेगाव दाभाडे (पुरुष, 81 वर्ष), कामशेत (पुरुष, 64 वर्ष), वडगाव (पुरुष, 62), वडगाव (पुरुष, 50 वर्ष), तळेगाव स्टेशन (पुरुष, 68 वर्ष), तळेगाव स्टेशन (महिला, 85 वर्ष) येथील आहेत.

रविवारी रात्री तीन रुग्णांचा मृत्यू झाला. हे रुग्ण तळेगाव दाभाडे रविवार पेठ (पुरुष, 81 वर्ष), डोळसनाथ आळी (महिला, 85 वर्ष), श्रवणी बिल्डिंग , सेवधाम हॉस्पिटल जवळ (पुरुष, 55 वर्ष) येथील आहेत.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 31 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 14 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत येथील चार, माळवाडी, सोमाटणे येथील प्रत्येकी दोन, चांदखेड, धामणे, सुदवडी, बेबडओहळ, मोहितेवाडी, आंबी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 12, लोणावळा शहरात 17 आणि वडगावमध्ये 2 रुग्णांची नोंद झाली आहे.

एकूण 1 हजार 154 रुग्णांमध्ये सध्या 423 रुग्ण सक्रीय आहेत. तर 690 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 376, लोणावळा नगरपरिषद 122 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 79 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 577 रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या रुग्णालयात 399 आणि होम आयसोलेशनमध्ये 24 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.