Maval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 03 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह 

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात सोमवार (दि.25) 03 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात एकही डिस्चार्ज नाही. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 37 आहे.

वडगाव नगरपंचायत व लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. तर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 03 रुग्ण सापडले आहेत. सध्या रुग्णालयात 37 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8078 झाली आहे. तर दिवसभरात आज एकही डिस्चार्ज नाही. सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 03 रुग्ण सापडले तर ग्रामीण भागात एकही रुग्ण सापडला नाही.

ग्रामीण भागात एकही रूग्ण सापडला नाही तर शहरी भागात 03 रुग्ण सापडले तर 37 रुग्ण सक्रिय आहेत. 7817 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2440, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1602 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 536 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4578 रुग्ण तर ग्रामीण भागात 3500 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.