Maval Corona Update : तालुक्यात आज 03 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह; सक्रिय रूग्णांची संख्या 48

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी जास्त होत आहे. तालुक्यात मंगळवारी (दि. 1) 03 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 08 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रूग्णांची संख्या 48 आहे.

वडगाव नगरपंचायत, तळेगाव दाभाडे नगरपरिषद व लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत आज प्रत्येकी 1 सध्या रुग्णालयात 48 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7682 झाली आहे. तर दिवसभरात 08 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 3 रुग्ण तर ग्रामीण भागात एकही रूग्ण सापडला नाही.

ग्रामीण भागात एकही रूग्ण सापडला नाही तर शहरी भागात तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 01 रूग्ण व लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 01रूग्ण आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 1असे मिळून 03 सापडले. 48 रुग्ण सक्रिय आहेत. 7413 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील आज कोरोना रूग्णाचा एकही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 221 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2251, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1540 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 523 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4314 रुग्ण तर ग्रामीण भागात 3368 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.