Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज केवळ 9 रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असून आज रविवार (दि. 1 नोव्हें.) केवळ 9 रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच कोरोनामुळे आज एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 

तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 7453 झाली आहे. तर दिवसभरात 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 8 रुग्ण शहरी भागात तर 1 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. आतापर्यंत 212 मृत्यू झाले आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये पुसाणे येथे 1 रुग्ण सापडला आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 6 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 2 असे एकूण 8 रुग्ण सापडले तर लोणावळा नगरपरिषद हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. 179 रुग्ण सक्रिय आहेत. 7062 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2167, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1475 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 513 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 4155 रुग्ण तर ग्रामीण भागात 3298 रुग्ण आढळून आले आहेत. एका रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहरे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.