Maval Corona Update: मावळ तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाचा पहिला मृत्यू लोणावळ्यात

Maval Corona Update: The first death of a corona patient in Maval taluka took place in Lonavala मावळ तालुक्यात आज अखेर 41 जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी 23 जण सक्रिय रुग्ण असून 17 जण बरे झाले आहेत.

एमपीसी न्यूज – वलवण (लोणावळा) येथील एका 56 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मंगळवारी (ता. 16) दुपारी पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

मावळ तालुक्यात आज अखेर 41 जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी 23 जण सक्रिय रुग्ण असून 17 जण बरे झाले आहेत. दरम्यान, मावळ तालुक्यात कोरोना संसर्गाचा पहिला मृत्यू झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

संबंधित महिला कॅन्सरग्रस्त होती. ती एक जून रोजी दुबई येथून गोव्याला आली होती. गोवा येथून दोन जून रोजी खाजगी वाहनाने लोणावळ्यातील स्वतःच्या घरी आली होती. 12 तारखेपर्यंत ती होम क्वारंटाइन होती.

12 तारखेला रात्री श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने 13 तारखेला त्यांना पहाटे उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना तपासणी केली असता स्वॅब पॉझिटिव्ह आला होता.

उपचार सुरू असताना आज मंगळवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या संपर्कातील पती व दोन मुलांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

तालुक्यात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या व त्यात कोरोना बाधिताच्या मृत्यूची घटना घडल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.