Maval Corona Update: मावळात नव्या रुग्णांची संख्या घटली; दिवसभरात 9 नवे रुग्ण

Maval Corona Update: The number of new patients in Maval has decreased; 9 new patients throughout the day तळेगाव, खंडाळा, कामशेत, ब्राम्हणवाडी, देवले, साई येथे रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (बुधवारी) नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटली असून दिवसभरात नऊ नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये तळेगाव दाभाडे, खंडाळा, कामशेत, ब्राम्हणवाडी, देवले व साई येथील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

कामशेत, खंडाळा, ब्राम्हणवाडी, देवले व साई येथे प्रत्येकी एक रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर तळेगाव दाभाडे येथे 4 रुग्ण आढळले आहेत. असे एकूण 9 रुग्ण आज दिवसभरात पॉझिटिव्ह आढळले आहेत. दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णसंख्येचा तुलनेत आज नवीन रुग्णांची संख्या घटलेली दिसते. आज अखेर आठ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

तळेगाव दाभाडे येथील शनिवार पेठ, भेगडे आळीतील (प्रभाग क्र 11)  50 वर्षीय व्यक्ती, मनोहरनगरमधील वरद विनायक मंदिराशेजारील 29 वर्षीय व्यक्ती, प्रभाग क्र 3 विद्या विहार काॅलनीतील 44 वर्षीय व्यक्ती यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तर प्रभाग क्र 6 मधील साई रेसिडेन्सी येथील काल दि 14 रोजी पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीच्या पत्नीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

आजअखेर तालुक्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या 262 झाली असून यापैकी नऊ जणांचा मृत्यू तर 95 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 158 असून यापैकी 117 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 41 जणांवर होम क्वारंटाईन करून उपचार सुरू आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी गुणेश बागडे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील आजपर्यंत आढळलेल्या कोरोना रूग्णांची संख्या 70 असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून 41 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 26 जण उपचार घेत आहेत. अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.