Maval Corona Update : मावळात आज तिघे पॉझिटिव्ह; चार जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात शुक्रवार (दि.29) 03 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 04जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. तालुक्यातील सक्रिय रूग्णांची संख्या 40 आहे.

वडगाव नगरपंचायत व लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रूग्ण सापडला नाही. तर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 02 रूग्ण सापडले आहेत. सध्या रूग्णालयात 40 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या 8104 झाली आहे.

आज दिवसभरात 04 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 02 रुग्ण, तर ग्रामीण भागात आढले येथे 01 रूग्ण सापडला. आजपर्यंत 7840 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू झाला. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2453, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1604 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 536 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4593 रुग्ण तर ग्रामीण भागात 3511रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.