Maval Corona Update : आज 31 जण कोरोनामुक्त तर 34 रुग्णांची वाढ

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.6) 34 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 31जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एक रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला असून, आतापर्यंत 523 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 474 आहे. शहरी भागात 9 तर ग्रामीण भागात 25 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 3  लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 5 आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 1 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 26,198 झाली आहे. तर दिवसभरात 31 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात वराळे, कामशेतव सोमाटणे प्रत्येकी 4, आंबी व तिकोणा प्रत्येकी 2, शिवली, इंदोरी, तळेगाव दाभाडे ग्रामीण, सुदुंबरे, कार्ला, भडवली, चिखलसे, वळवंती व कचरेवाडी प्रत्येकी 1 असे एकूण 25 रुग्ण सापडले.

25,201 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत आतापर्यंत 523 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,227 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,352 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,311रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 13,890 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,308 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.19 टक्के आहे तर मृत्यू दर 2 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 87 लोणावळा नगरपरिषद मध्ये 47 वडगाव नगरपंचायत मध्ये 24 व ग्रामीण भागात 316 असे एकूण 474 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.