Maval Corona Update : आज तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 60 पेक्षा कमी; 64 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील रुग्ण संख्या कमी होऊ लागली असुन रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. मावळ तालुक्यात सोमवारी (दि. 7) 53 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 64 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज चार रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद झाली असुन, आतापर्यंत 449 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 716 आहे.

शहरी भागात 21 तर ग्रामीण भागात 33 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 12 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 9 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 2 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 22480 झाली आहे. तर दिवसभरात 64 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात इंदोरी 5, नवलाख उंब्रे व तळेगाव दाभाडे ग्रामीण प्रत्येकी 4, नाणे 3, दारुंब्रे व कुणे नामा प्रत्येकी 2, भोयरे, चिखलसे, कामशेत, कान्हे, कुसगाव खुर्द, मळवंडी ठुले, माळवाडी, सुदुंबरे, टाकवे बुद्रुक व येलघोल प्रत्येकी 1१ असे एकूण 30 रुग्ण सापडले.

21315 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7237, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3875 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1158 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 12270 रुग्ण तर ग्रामीण भागात 10210 रुग्ण आढळून आले आहेत. 3 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.82 टक्के आहे तर मृत्यू दर 2 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 178 लोणावळा नगरपरिषदमध्ये 81 वडगाव नगरपंचायत मध्ये 32 व ग्रामीण भागात 425 असे एकूण 716 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.